Hi Tujhicha Na Nagari (From "Asha Asavya Suna")

ही तुझीच ना नगरी, श्रीहरी
तुझीच ना नगरी
मग तिथं गरिबी, तिथं अमिरी
भेद असा का तुझ्या दारीशी, हरी?
ही तुझीच ना नगरी

कुणा वाढीशी नको तेवढे
श्रीखंड, शिरा, पुरी
कुणा घालीशी अर्धच पोटी
कांदा, मीठ, भाकरी

या अशा कशा बा तंव न्यायाच्या परी?
सांगशी हरी, सांगशी हरी?
ही तुझीच ना नगरी

कुणा झोपवी थोपटूनी तू
गाद्या, गिरद्या वरी
कुणा झोपवी नाक दाबूनी
उघड्या जमिनीवरी

ही रीत तुला बा कशी वाटते बरी?
सांगशी हरी, सांगशी हरी?
ही तुझीच ना नगरी

कुणा बैसवी थाट धरुनी
सुवर्ण राशी वरी
कुणा बांधुनी गळ्यात दोरी
फिरवीशी रस्त्यावरी

तशाच ऐसा क्रूर खेळ हा
तूच खेळतो तरी
सांगशी हरी, सांगशी हरी?
ही तुझीच ना नगरी

तू देव कुणाचा तरी
तू देव कुणाचा तरी
राहतोस कुठे भूवरी?
गरिबांच्या का, श्रीमंतांच्या घरी

शेवटचा हा सवाल इतुका
पुसते तुला, मुरारी
अशी विषमता कोठवरी बा
राहील अवनी वरी?

राहील अवनी वरी?
राहील अवनी वरी?



Credits
Writer(s): Mama Meherkar, S Gujar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link