Ha Unad

हा उनाड अवखळ वारा
या टपोर श्रावणधारा
हा उनाड अवखळ वारा
या टपोर श्रावणधारा

फुलवून पिसारा सारा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा

हे कुंतल-काळे मेघ
डोळ्यांत नाचते वीज
अंगावर फुलुनी आली
ही यौवनातली लाज
ही यौवनातली लाज

चालीतून माझ्या भरला
हरिणीचा नाजूक नखरा

फुलवून पिसारा सारा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा

हातावरी माझ्या रंगे
कोवळ्या कळ्यांची मेंदी
हातावरी माझ्या रंगे
कोवळ्या कळ्यांची मेंदी

सुमगंध सोडुनी भुंगे
लागलेत माझ्या नादी
लागलेत माझ्या नादी

बांधिते अशी पदराशी
गंधीत फुलांच्या नजरा

फुलवून पिसारा सारा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा

बहराच्या हिरव्या रानी
परदेशी आला रावा
भुलवून जिवाला बाई
तो नेई दूरच्या गावा
तो नेई दूरच्या गावा

मधुबोल तयाचे रुजवी
अंगावरी गोड शहारा

फुलवून पिसारा सारा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा

हा उनाड अवखळ वारा
या टपोर श्रावणधारा

फुलवून पिसारा सारा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा
तू नाच आज रे, मोरा



Credits
Writer(s): Ram More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link