Ha Sagari Kinara

हा सागरी किनारा

ओ-ओ, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे, हा रेशमी निवारा
हा रेशमी निवारा

ओ-ओ, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
अंगावरी शहारा

ओ-ओ, हा सागरी किनारा

मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी
ही भेट येगळी का न्यारीच आज गोडी
मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी
ही भेट येगळी का न्यारीच आज गोडी

का भूल ही पडावी
ओ,ओ,ओ
का भूल ही पडावी, वळखून घे इशारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
अंगावरी शहारा

ओ-ओ, हा सागरी किनारा

होते अजाणता मी ते छेडले तराणे
होते अजाणता मी ते छेडले तराणे
स्वीकारल्या सुरांचे आले जुळून गाणे
हा रोम-रोम गाई

हा रोम-रोम गाई
गातो निसर्ग सारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
हा रेशमी निवारा

ओ-ओ, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link