Chala Re Chala

(स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ)
(स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ)

चला रे, चला अक्कलकोटी जाऊया
जाऊया स्वामींना भेटूया
(चला रे, चला अक्कलकोटी जाऊया)
(जाऊया स्वामींना भेटूया)

ओढ ही लागे स्वामींची, साद ही येई स्वामींची
सगुण या दत्त माऊलीची, वाट ही अक्कलकोटीची

स्वामी समर्थ गाऊया
चला रे, चला अक्कलकोटी जाऊया
जाऊया स्वामींना भेटूया
(चला रे, चला अक्कलकोटी जाऊया)
(जाऊया स्वामींना भेटूया)

सत्याशिवाचे रूप हे सुंदर, गाभारी हे ध्यान निरंतर
(गाभारी हे ध्यान निरंतर)
स्वामी रूपाने भरले अंतर समर्थ नामे जन्म मनोहर
(समर्थ नामे जन्म मनोहर)

सद्गुरूच्या ह्या स्मरणाने जीवन हे तारुया
चला रे, चला अक्कलकोटी जाऊया
जाऊया स्वामींना भेटूया
(चला रे, चला अक्कलकोटी जाऊया)
(जाऊया स्वामींना भेटूया)

सहा रिपुंची विरली माया, अक्कलकोटी आलो सत्वर
(अक्कलकोटी आलो सत्वर)
मनशांतीच्या मठात सुंदर सर्व सुखाचा भेटे सागर
(सर्व सुखाचा भेटे सागर)

अजानबाहू सगुण रुपी दत्त रूप पाहूया
चला रे, चला अक्कलकोटी जाऊया
जाऊया स्वामींना भेटूया
(चला रे, चला अक्कलकोटी जाऊया)
(जाऊया स्वामींना भेटूया)

तनामनाची गुंजे वीणा, सूर आळवी स्वामी गुरूंना
(सूर आळवी स्वामी गुरूंना)
सदैव लाभो प्रसाद तुमचा स्वामी पदाशी हीच प्रार्थना
(स्वामी पदाशी हीच प्रार्थना)

दत्तगुरूंच्या ह्या अवतारी भजनातुनी रमुया
चला रे, चला अक्कलकोटी जाऊया
जाऊया स्वामींना भेटूया
(चला रे, चला अक्कलकोटी जाऊया)
(जाऊया स्वामींना भेटूया)

ओढ ही लागे स्वामींची, साद ही येई स्वामींची
सगुण ह्या दत्त माऊलीची, वाट ही अक्कलकोटीची

स्वामी समर्थ गाऊया
चला रे, चला अक्कलकोटी जाऊया
जाऊया स्वामींना भेटूया
(चला रे, चला अक्कलकोटी जाऊया)
(जाऊया स्वामींना भेटूया)

महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)

महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)



Credits
Writer(s): Nandu Honap, Parvin Davne
Lyrics powered by www.musixmatch.com

Link