Bayko Pahije Gori

जो तो मुलगा...
जो तो मुलगा म्हणतो मजला
बायको पाहिजे गोरी
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?

आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?

काल एक पाहुणा आला
पोर दावीयली पोराला
गुण तिचे वर्णिले त्याला
तो चौघा समोर म्हणाला

गुणान पोरगी असो कशी ही
गुणान पोरगी असो कशी ही
रंगान पाहिजे गोरी
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?

आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?

हा देवून काळा रंग
कसा आनी देव प्रसंग
त्या पोरी बिचाऱ्या तंग
लग्न करतील कोणा संग

गोरा ही म्हणतो गोरी पाहिजे
गोरा ही म्हणतो गोरी पाहिजे
काळा ही म्हणतो गोरी
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?

आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?

जर असेच हे चालणार
हा प्रश्न कसा सुटणार?
ही दुनिया बदलली ठारं
आता दोष कुणा देणार

काळ्यासोबत लग्न खुशीन
काळ्यासोबत लग्न खुशीन
करती गोऱ्या पोरी
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?

आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?

हा आहे घोर अन्याय
कोणी ही करी ना न्याय
कुणी सांगा यासी उपाय
बापानं कराव काय?

निघून जावं का, मरून जावं
निघून जावं का, मरून जावं
गळ्याला लावून दोरी
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?

आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?
आता तुम्हीच सांगा पाहुण
कुठं जातील काळ्या पोरी?



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Manik Mane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link