Makhmali

तू पहाव, मी हराव मन होई का बावरं?
मी लपाव, तू झुराव होई अस का बर?

घडलं कधी हे समजना काही
येई कसा ओंजळी चांदवा?
मखमली, मखमली, मखमली रेशमाचा तू आस
रेशमी, रेशमी, रेशमी बंध जुळला नवा

जडला जीव तुझ्या या जीवावरती, झालंय पूरतं दंग
चुकला ठोका कसा काळजाचं गं? धडधड वाढे संग

हे, सपान पहाटेचं, अधुऱ्याश्या भेटीचं
इशारा दे नजरेचा मला
हे, मोगऱ्याची दरवळं, श्वासातून घुटमळं
तुझ्यापायी झालो मी खुळा

घडलं कधी हे समजना काही
येई कसा ओंजळी चांदवा?
मखमली, मखमली, मखमली रेशमाचा तू आस
रेशमी, रेशमी, रेशमी बंध जुळला नवा

जपलं सारं तुझ्या-माझ्या पिरतीत, उतरं गाली रंग
भिनलं वारं पुनवेच्या भरतीचं, चढली न्यारी झिंग

हे, तुझं रूप डोळ्यात, तुझा श्वास श्वासात
तुझा हात हातात असा
हे, उमलंल चांदनं, अंगभर गोंदुन
फुलाचा शहारा हा नवा

घडलं कधी हे समजना काही
येई कसा ओंजळी चांदवा?
मखमली, मखमली, मखमली रेशमाचा तू आस
रेशमी, रेशमी, रेशमी बंध जुळला नवा



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Nilesh Vijay Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link