Roj Roj Navyane (Male)

अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहिल ते ही आनंदाने
अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहिल ते ही आनंदाने

तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने

सोनेरी किरणे डोळ्यात लेऊन
कोवळे से ऊन होऊन ये जरा
बिल्लोरी चांदणं कानात माळून
भरले आभाळ होऊन

कधी-कधी बरसुन ये, कधी-कधी हमसून ये
कधी-कधी दाटून येना जरा
कधी-कधी सांगून ये, कधी-कधी ना सांगता
कधी-कधी फसवून येना जगाला साऱ्या

क्षण साद ही देतील एक मुक्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने

श्वासात भरून आण कधी फुले
होऊन ये तूच कधी तिन्हीं ऋतु
बोटाने दूर कर बटा या लाजेच्या
गालावरी रान गावाचं

कधी-कधी वेचुन ये, कधी-कधी न्हाऊन ये
कधी-कधी बिलगून येना जरा
कधी-कधी हरवून ये, कधी-कधी शोधून ये
कधी-कधी चुकवून येना जगाला साऱ्या

मग प्रित ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
मग प्रित ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने



Credits
Writer(s): Amitraj, Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link