Avachita Parimalu

अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू
अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू
मी म्हणे, "गोपाळू आला, गे माये"
अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू

चांचरती-चांचरती बाहेरी निघाले
चांचरती-चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेलें काय करू
अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू

तो सावळा सुंदरू, कांसे पितांबरू
तो सावळा सुंदरू, कांसे पितांबरू
लावण्य मनोहरू देखियेला
अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू

बोधुनी ठेलें मन, तव जालें आन
सोकोनी घेतले प्राण माझे, गे माये
सोकोनी घेतले प्राण माझे, गे माये
अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू

बाप रखुमादेवी वरू, विठ्ठल सुखाचा
बाप रखुमादेवी वरू, विठ्ठल सुखाचा
विठ्ठल सुखाचा, विठ्ठल सुखाचा
तेणें काया मने वाचा वेधियेलें

अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू
मी म्हणे, "गोपाळू आला, गे माये"
अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू



Credits
Writer(s): Req., Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link