Bheti Lagi Jiva Lagalise Aas

भेटीलागी जीवा लागलीसे आस
भेटीलागी जीवा लागलीसे आस
भेटीलागी जीवा लागलीसे आस

पाहे रात्रीं-दिवस...
पाहे रात्रीं-दिवस वाट तुझी
भेटीलागी जीवा लागलीसे आस

पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन
पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन
तैसे माझे मन...
हो, तैसे माझे मन वाट पाहे
भेटीलागी जीवा लागलीसे आस

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, लेकी आसावली
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, लेकी आसावली
पाहतसे वाटुली...
पाहतसे वाटुली पंढरीची
भेटीलागी जीवा लागलीसे आस

भुकेलिया बाळ अति शोक करी
भुकेलिया बाळ अति शोक करी
वाट पाहे परि...
हो, वाट पाहे परि माऊलीची
भेटीलागी जीवा लागलीसे आस

तुका ह्मणे, "मज लागलीसे भूक, लागलीसे भूक"
तुका ह्मणे, "मज लागलीसे भूक, लागलीसे भूक"
धावुनी श्रीमुख...
धावुनी श्रीमुख दावी देवा
भेटीलागी जीवा लागलीसे आस
भेटीलागी जीवा लागलीसे आसCredits
Writer(s): Shrinivas Khale, Anil Mohile, Sant Tukaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link