Neej Mazya Nandlala

निज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

निज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
निज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

शांत हे आभाळ सारे
शांत हे आभाळ सारे
शांत तारे, शांत वारे
शांत तारे, शांत वारे

या झऱ्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे
निज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

झोपल्या गोठयात गायी
सादवा, पडसाद नाही
झोपल्या गोठयात गायी
सादवा, पडसाद नाही

पाखरांचा गलबला ही बंद झाला, बंद झाला रे
निज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

सावल्यांची तीट गाली
सावल्यांची तीट गाली
चांदण्याला निज आली
चांदण्याला निज आली

रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे
निज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

निज रे आनंदकंदा
निज रे माझ्या मुकुंदा
निज रे आनंदकंदा
निज रे माझ्या मुकुंदा

आवरी या घागऱ्यांच्या छंदताला, छंदताला रे
निज माझ्या नंदलाला, नंदलाला रे, नंदलाला रेCredits
Writer(s): Mangesh Padgaokar, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link