Jay Dev Jay Dev Datta Avadhoota

जय देव, जय देव
दत्ता अवधूता, हो, साईं अवधूता
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा
जय देव, जय देव

अवतरसी तूं येतां धर्मातें ग्लानी
नास्तिकांनाही तू लाविसि निजभजनीं
दाविसि नाना लीला असंख्य रुपांनीं
हरिसी दीनांचें तू संकट दिनरजनी

जय देव, जय देव
दत्ता अवधूता, हो, साईं अवधूता
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा
जय देव, जय देव

यवनस्वरुपीं एक्या दर्शन त्वां दिधलें
संशय निरसुनियां तदद्घैता घालविलें
गोपीचंदा मंदा त्वांची उद्घरिलें
मोमिन वंशीं जन्मुनि लोकां तारियले

जय देव, जय देव
दत्ता अवधूता, हो, साईं अवधूता
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा
जय देव, जय देव

भेद न तत्वीं हिंदूयवनांचा कांहीं
दावायासी झाला पुनरपि नरदेही
पाहसिं प्रेमानें तू हिंदूयवनांही
दाविसी आत्मत्वाने व्यापक हां साईं

जय देव, जय देव
दत्ता अवधूता, हो, साईं अवधूता
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा
जय देव, जय देव

देवा साईंनाथ त्वत्पदनत व्हावें
परमायामोहित जनमोचन झणिं व्हावें
त्वत्कृपया सकलांचें संकट निरसावें
देशिल तरि दे त्वघश कृष्णानें गावें

जय देव, जय देव
दत्ता अवधूता, हो, साईं अवधूता
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा
जय देव, जय देव



Credits
Writer(s): Mayuresh Pai
Lyrics powered by www.musixmatch.com

Link