Halke Halke Jojava Balacha Palna - From "Bala Gau Kashi Angaai"

हलके-हलके जोजवा
हलके-हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हो
हलके-हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हो
हलके-हलके जोजवा, जोजवा, जोजवा

सजली गं मऊमऊ मखमालीची शैय्या
सजली गं मऊमऊ मखमालीची शैय्या
निजली गं बाळाची गोरी-गोरी काया
निजली गं बाळाची गोरी-गोरी काया
बाळ रुपडे देवाचे भुलविते लोचना
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हो
हलके-हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हो
हलके-हलके जोजवा, जोजवा, जोजवा

कुर्रर करा कानात हळूच भेटा गं
कुर्रर करा कानात हळूच भेटा गं
बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा गं
बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा गं
हो, आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हो
हलके-हलके जोजवा...
हलके-हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हो
हलके-हलके जोजवा, जोजवा, जोजवा



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, N Dutta
Lyrics powered by www.musixmatch.com

Link