Malachya Malyamadhi (From "Sadhi Mansa")

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं
गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवीत
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं
गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवीत
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं

दादाच्या मळ्यामंदी, मोटचं मोटं पाणी
पाजिते रान सारं मायेची वयनी
दादाच्या मळ्यामंदी, मोटचं मोटं पाणी
पाजिते रान सारं मायेची वयनी

हसत, डुलत मोत्याचं पीक येतं
गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवीतं
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं

लाडकी लेक, राजाचा ल्योक
लगीन माझ्या चिमनीचं

सावळा बंधूराया, साजिरी वयनी बाई
सावळा बंधूराया, साजिरी वयनी बाई
गोजिरी शिरपा हौसा, माहेरी माझ्या हाई

वाटेनं माहेराच्या धावत मन जातं
गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवीतं
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं
गडनी-सजनी, गडनी-सजनी, गडनी गं

राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी? जीवाचं लिंबलोनं
राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी? जीवाचं लिंबलोनं

मायेला पूर येतो, पारुचं मन गातं
गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवीतं
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं
गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवीत
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातंCredits
Writer(s): Yogesh, Anandghan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link