Prema Kay Devu Tula

प्रेमा काय देऊ तुला?
भाग्य दिले तू मला, भाग्य दिले तू मला

प्रीतीच्या या पाखराचे
प्रीतीच्या या पाखराचे रत्नकांचनी पंख देऊ का?
प्रीतीच्या या पाखराचे रत्नकांचनी पंख देऊ का?
देऊ तुला का हर्ष गंध हा जीव फुलातून मोहरलेला?
भाग्य दिले तू मला, भाग्य दिले तू मला

या हृदयीच्या जलवंतीची
या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढ ती तुला हवी का?
रुप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला?
भाग्य दिले तू मला, भाग्य दिले तू मला

मोहक सुंदर जे-जे दिसते
मोहक सुंदर जे-जे दिसते, तूच तयांचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरीता अधरीच्या या अमृताला?
भाग्य दिले तू मला
प्रेमा काय देऊ तुला? भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मलाCredits
Writer(s): P Savalaram, Vasant Prabhu
Lyrics powered by www.musixmatch.com

Link