Majhe Gaane

माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे
माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे, माझे गाणे

सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे
आशेच्या वीणेचा चढवुनी सूर भौतिकात
हे गाणे, हे प्रियकर, माझे गाणे मी गात, माझे गाणे

निरध्वनी हे, मूक गान हे यास म्हणो कोणी?
निरध्वनी हे, मूक गान हे यास म्हणो कोणी?
नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले
माझे-माझे विश्व तार ही प्रेमाची बोले, माझे गाणे

ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला
हे नंदनवन ही स्वरभूमि एक पहा झाली
मंगल-मंगल मद्गानाची गति ही शेवटली, माझे गाणे
माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणेCredits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Balkavi Thombre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link