Rang Khelato Hari

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी, आज गोकुळात सखी

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल फासतो

सांगते अजूनही तुला परोपरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी, आज गोकुळात सखी

सांग श्याम सुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
सांग श्याम सुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास-त्यास रंग, रंग, रंग लागले

एकटीच वाचशील काय तू तरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी, आज गोकुळात सखी

त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोप-गोपिकांसवे मुकुंद दंगला
त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोप-गोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा, तो पहा मृदुंग मंजिर्यात वाजला

हाय वाजली फिरुन, हाय वाजली फिरुन तीच बासरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरीCredits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Suresh Bhat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link