Vadal Vara Sutala Ga

वादलवारं सुटलं गो
वादलवारं सुटलं गो
वार्यानं तुफान उठलं गो
वार्यानं तुफान उठलं गो

भिरभिर वार्यात, पावसाच्या मार्यात
सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादलवारं सुटलं गो
वार्यानं तुफान उठलं गो

गडगड ढगात बिजली करी
फडफड शिडात, धडधड उरी
गडगड ढगात बिजली करी
फडफड शिडात, धडधड उरी

एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुनी नाय
एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुनी नाय

सळसळ माडांत, खोपीच्या कुडांत
जागणार्या डोल्यांत सपान मिटलं
वादलवारं सुटलं गो!
वार्यानं तुफान उठलं गो

सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ
सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ

कमरेत जरा वाकूनिया
पान्यामंदी जालं फेकूनिया
कमरेत जरा वाकूनिया
पान्यामंदी जालं फेकूनिया

नाखवा माझा, दर्याचा राजा
लाखाचं धन यानं जाल्यात लुटलं
वादलवारं सुटलं गो
वार्यानं तुफान उठलं गो

भिरभिर वार्यात, पावसाच्या मार्यात
सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादलवारं सुटलं गो
वार्यानं तुफान उठलं गो

वादलवारं सुटलं गो
वार्यानं तुफान उठलं गो
वादलवारं सुटलं गो
वार्यानं तुफान उठलं गोCredits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link