Marathi Pavool Padate Pudhe - From "Maratha Tituka Melvava"

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला, भला देखे

स्वराज्य तोरण चढे (स्वराज्य तोरण चढे)
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे
मराठी पाउल पडते पुढे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे
मराठी पाउल पडते पुढे

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपाऊली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
आजच दसरा, आज दिवाळी
चला सयांनो, अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे
मराठी पाउल पडते पुढे
मराठी पाउल पडते पुढे
मराठी पाउल पडते पुढे

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज: प्रवाहे
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे
मराठी पाउल पडते पुढे

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय-जय रघुवीर समर्थ
जय-जय रघुवीर समर्थ, जय-जय रघुवीर समर्थ
जय-जय रघुवीर समर्थ, जय-जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
शुभघडीला
जय भवानी, जय भवानी
जय भवानी, जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी, घुमत वाणी
शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
शुभघडीला

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे

सह्याद्रीचे कडे



Credits
Writer(s): Shanta Shelke, Anandghan Anandghan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link