Sakhyano Karu Det Shrungar

करु देत शृंगार, सख्यांनो, करु देत शृंगार
करु देत शृंगार, सख्यांनो, करु देत शृंगार

अग्निवाचून आज करितसे...
अग्निवाचून आज करितसे राजपुती जोहार
करु देत शृंगार, सख्यांनो, करु देत शृंगार

जीवंत पती, मी सती जातसे
जीवंत पती, मी सती जातसे
भाग्य लाभले कुणा कधी असे?

मृदुल-मृदुल तर या कमलाचा यज्ञी स्वाहाकार
करु देत शृंगार, सख्यांनो, करु देत शृंगार

ही भाग्याची वेळ, साजणी
ही भाग्याची वेळ, साजणी
भांग भरा गं, गुंफा वेणी

राजपुतीच्या नयनी का कधी दिसते अश्रूधार?
करु देत शृंगार, सख्यांनो, करु देत शृंगार

मला न माहित कोण यवन तो
मला न माहित कोण यवन तो
कोण जाणती मृत्यु काय तो?

हासत-हासत मिठी मरणाला हा अमुचा संसार
करु देत शृंगार, सख्यांनो, करु देत शृंगार

Credits
Writer(s): G D Madgulkar, P L Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link