Trailokya Vyapuni

त्रैलोक्य व्यापुनीही कोठे न राहणारा
माझा गणेश नाही मखरात मावणारा
माझा गणेश नाही मखरात मावणारा
माझा गणेश नाही मखरात मावणारा

नक्षत्र मंडलाची माथ्यावरी झळाळी
नक्षत्र मंडलाची माथ्यावरी झळाळी
आरक्त सुर्यभाळी...
आरक्त सुर्यभाळी सिंदूर लावणारा

माझा गणेश नाही मखरात मावणारा
माझा गणेश नाही मखरात मावणारा

मूर्ती अमूर्त याची रेखाल काय चित्री?
मूर्ती अमूर्त याची रेखाल काय चित्री?
विज्ञान रुपसूत्री...
विज्ञान रुपसूत्री भूगोल ओवणारा

माझा गणेश नाही मखरात मावणारा
माझा गणेश नाही मखरात मावणारा

भक्तास ना कळे हा, पोथीतूनी पळे हा
भक्तास ना कळे हा...

भक्तास ना कळे हा, पोथीतूनी पळे हा
संशोध का मिळे हा...
संशोध का मिळे हा सत्यास पावणारा

माझा गणेश नाही मखरात मावणारा
माझा गणेश नाही मखरात मावणारा

आहे प्रकाश रूपे विश्वात गोंदलेला

आहे प्रकाश रूपे विश्वात गोंदलेला
रेणुत कोंडलेला...
रेणुत कोंडलेला, बुद्धीस भावणारा

माझा गणेश नाही मखरात मावणारा
माझा गणेश नाही मखरात मावणारा



Credits
Writer(s): Vasant Bapat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link