Ye Aboli Laaj Daahi

ये अबोली लाज गाली
रंग माझा वेगळा
ऐक राणी, गूज कानी
हा सुखाचा सोहळा

ये अबोली लाज गाली
रंग माझा वेगळा
ऐक राणी, गूज कानी
हा सुखाचा सोहळा

मी दिले काही तुला गं
मी ही राजा घेतले
ये कळी पहिली सुखाला
गुपित सांगे आतले

स्वप्न अधरी, स्वप्न पदरी
भाव रूजला कोवळा

ये अबोली लाज गाली
रंग माझा वेगळा
ऐक राणी, गूज कानी
हा सुखाचा सोहळा

पाकळीच्या पावलांच्या
गंध-गहिऱ्या चाहुली
स्वप्न ये हातात माझ्या
होऊनिया बाहुली

बाहुलीला जोजवीता
गीत येते या गळा

ये अबोली लाज गाली
रंग माझा वेगळा
ऐक राणी, गूज कानी
हा सुखाचा सोहळा

जे हवे ते सर्व लाभे
काय मागू मी दुजे?
चित्र भावी जीवनाचे
बिंब हे माझे-तुझे

लागला साऱ्या घराला
हा असा याचा लळा

ये अबोली लाज गाली
रंग माझा वेगळा
ऐक राणी, गूज कानी
हा सुखाचा सोहळा



Credits
Writer(s): Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link