Swapnat Sajana Yeshil Ka

स्वप्नात साजणा, येशील का?
चित्रात रंग हे भरशील का? येशील का?

स्वप्नात साजणा, येशील का?
स्वप्नात साजणा, येशील का?
चित्रात रंग हे भरशील का? येशील का?
स्वप्नात साजणा, येशील का?

येशील का? येशील का?
स्वप्नात साजणा, येशील का?

मी जीवन गाणे गावे
मी जीवन गाणे गावे
तु स्वरात चिंब भिजावे
तु स्वरात चिंब भिजावे

दोघांनी हरवून जावे, हरवून जावे
ही किमया नकळत करशील का? येशील का?

स्वप्नात साजणा, येशील का?
स्वप्नात साजणा, येशील का?

ही धूंद प्रीतीची बाग
ही धूंद प्रीतीची बाग
प्रणयाला आली जाग
प्रणयाला आली जाग

रोमांचित गोरे अंग, गोरे अंग
विळख्यात रेशमी धरशील का? येशील का?

स्वप्नात साजणा, येशील का?
स्वप्नात साजणा, येशील का?

प्रतिमेचे चुंबन घेता
प्रतिमेचे चुंबन घेता
जणू स्वर्गच येई हाता
जणू स्वर्गच येई हाता

मधुमीलन होता-होता, होता-होता
देहात भरून तु उरशील का? येशील का?

स्वप्नात साजणा, येशील का?
स्वप्नात साजणा, येशील का?
चित्रात रंग हे भरशील का? येशील का?
स्वप्नात साजणा, येशील का?
स्वप्नात साजणा, येशील का?



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Vishwanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link