Kuthe Kuthe Shodhu Tula

राहू कशी तुझ्याविना?
राहू कशी तुझ्याविना?
दुःख मनी हे मावे ना

शोधू कुठे सांग तुला?
शोधू कुठे सांग तुला?
विरह मला हा सहवेना
कुठे-कुठे शोधू तुला?

सात जन्मीचा तूच साथी
तरी का हा दुरावा
दृष्ट कुणाची लागे का?
नशिबी गंध उरावा

सात जन्मीचा तूच साथी
तरी का हा दुरावा?
दृष्ट कुणाची लागे का?
नशिबी गंध उरावा

संशय मनीचा सोड, सख्या रे
संशय मनीचा सोड, सख्या रे
विरह मला हा सहवेना

वाट पाहुनी नेत्रही थकले, उंबरठा झिजला
वाट पाहुनी नेत्रही थकले, उंबरठा झिजला
गंध फुलासी, मत्स्य जळासी
कधी का सोडूनि गेला?

अंत नको तू पाहू, सख्या रे
अंत नको तू पाहू, सख्या रे
विरह मला हा सहवेना
विरह मला हा सहवेना

राहू कशी तुझ्याविना?
दुःख मणी हे मावे ना

शोधू कुठे सांग तुला?
शोधू कुठे सांग तुला?
विरह मला हा सहवेना
कुठे-कुठे शोधू तुला?



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link