Aikavi Watate - Duet Version

तू अंबरात ही भासा परी
तू अंतरात ही श्वासा परी
मौनात स्वर तुझा रेंगाळतो (रेंगाळतो)
एकांत तुझा सवे झंकारतो

ऐकवी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा-पुन्हा
ऐकवी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा-पुन्हा

चाहूल तुझी बहराची, हिरव्या ऋतुची, सर पावसाची
कधी तू धग चांदण्याची, एका क्षणाची तरीही युगांची
प्राजक्त फिरतो जसा सहवास तुझा हा तसा
शब्दात सांगता न ये हा क्षण दरवळी असा

ऐकावी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा-पुन्हा
ऐकावी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा-पुन्हा

बेधुंद आसमंत सारा, बेभान वारा, गहिरा इशारा
एकाच लाटे साठी जणू आतुर झाला अवघा किनारा
कितीही भेटलो तरी भेटावे वाटते पुन्हा
अशी का ओढ लागते? का होते असे सांगना?

ऐकवी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा-पुन्हा
ऐकवी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा-पुन्हा

Credits
Writer(s): Avinash Vishwajeet, Vaibhav Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link