Chandanachi Choli - Original

उरी आग पेटली विरहाची
लावला लेप चंदनी
राग-रूसवा सोडा
सोडा अबोला, धनी

चांदणं असून कशी रात काळी-काळी?
कशी रात काळी-काळी?
चांदणं असून कशी रात काळी-काळी?
कशी रात काळी-काळी?

चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी
चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी

चांदणं असून कशी रात काळी-काळी?
कशी रात काळी-काळी?

चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी
चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी

सांगा जाऊ कुठं? सांगा जाऊ कुठं?
सांगा जाऊ कुठं? सांगा जाऊ कुठं?
सांगा तुमच्याविना जीव लावू कुठं?
सांगा तुमच्याविना जीव लावू कुठं?

आज एकलेपणी दुनिया झाली सुनी
उभ्या आगीत मी जशी जळते कळी
उभ्या आगीत मी जशी जळते कळी

चांदणं असून कशी रात काळी-काळी?
कशी रात काळी-काळी?

चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी
चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी

वाट बघते अशी, थाट करते अशी
वाट बघते अशी, थाट करते अशी
रूप न्याहाळायला आयना धरते अशी
रूप न्याहाळायला आयना धरते अशी

त्यात तुमची छबी म्होरं राहते उभी
जाते बावरून मी नार भोळी-खुळी
जाते बावरून मी नार भोळी-खुळी

चांदणं असून कशी रात काळी-काळी?
कशी रात काळी-काळी?

चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी
चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी

राया, जागू किती? झुरणी लागू किती?
राया, जागू किती? झुरणी लागू किती?
रंगमहालात ह्या सजा भोगू किती?
रंगमहालात ह्या सजा भोगू किती?

मला छेडतो मदन, दूर गेला सजन
बाई, आली कशी ताटातूटी भाळी
बाई, आली कशी ताटातूटी भाळी

चांदणं असून कशी रात काळी-काळी?
कशी रात काळी-काळी?

चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी
चंदनाची चोळी माझं अंग-अंग जाळी
अंग-अंग जाळी



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link