Na Na Na Na Nahi Nahi Ga (Alaoukik Gaani)

ना ना ना, ना ना ना
नाही, नाही, नाही ग
हो, आता पुन्हा मजसि येणे नाही ग

घन भरुन-भरुन, झरे गगन वरुन
कुणि साजण दुरुन मज दिसे कि हसे
खुणवि सये बाइ ग

ना ना ना, नाही, नाही, नाही ग
हो, आता पुन्हा मजसि येणे नाही ग

बोलती चुडे किन्न, किन्न, किन्न
कलश जल गाते ग
नुपूर बोले छुन, छुन, छुन
पाउल पुढे जाते ग

नवल घडे अहा, हं अहा, हं अहा
हृदय धडधडे कि उडे पदर सये बाइ ग

ना ना ना, ना ना ना
नाही, नाही, नाही ग
हो, आता पुन्हा मजसि येणे नाही ग

घन भरुन-भरुन, झरे गगन वरुन
कुणि साजण दुरुन मज दिसे कि हसे
खुणवि सये बाइ ग

ना ना ना, नाही, नाही, नाही ग

गहन वन झाले ग शीतल वारा
भिजले तनु सारी ग झेलून धारा, झेलून धारा

पवन वाजे सन्न, सन्न, सन्न
वेढुन मज घेतो ग
भ्रमर बोले गुण, गुण, गुण
साजण साद देतो ग

नयन झरे अहा, हं अहा, हं अहा
अधर थरथरे कि झुरे
आतुर मन बाइ ग

ना ना ना, ना ना ना
नाही, नाही, नाही ग
हो, आता पुन्हा मजसि येणे नाही ग

नाही सुचत काम, नाही रुचत धाम
मनमोहन श्याम मज दिसे कि हसे
सजण ठायी ठायी ग

ना ना ना, नाही, नाही, नाही ग
हो, आता पुन्हा मजसि येणे नाही ग



Credits
Writer(s): Mukherjee Manas, Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link