Runzuntya Pakhara (From "Tila Lavite Mi Raktacha")

घागर घुमूंदे-घुमूंदे, रामा, पावा वाजू दे
आला शंकरुबा-शंकरुबा, गवर माझी लाजू दे
घागर घुमूंदे-घुमूंदे, रामा, पावा वाजू दे
घागर घुमूंदे-घुमूंदे, रामा, पावा वाजू दे

रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा
(रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा)
आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा
(आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा)
(रुणझुणत्या पांखरा)

माझं माहेर सावली, उभी दारात माऊली
(माझं माहेर सावली, उभी दारात माऊली)
तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा
(तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा)
(रुणझुणत्या पांखरा)

(घागर घुमूंदे-घुमूंदे, रामा, पावा वाजू दे)
(आला शंकरुबा-शंकरुबा, गवर माझी लाजू दे)
(रुणझुणत्या पांखरा)

मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा
(मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा)
माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा
(माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा)
(रुणझुणत्या पांखरा)

(सौभाग्याचं लेणं, गवर माझी लेवू दे)
(मोरपंखी चोळी गवर माझी घालू दे)
(रुणझुणत्या पांखरा)

मला पुसते माऊली, आले कोणत्या पाऊली
(मला पुसते माऊली, आले कोणत्या पाऊली)
माझं गौराईचं पाय, माझा सोन्याचा उंबरा
(माझं गौराईचं पाय, माझा सोन्याचा उंबरा)
(रुणझुणत्या पांखरा)

(गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे)
(हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे)
रुणझुणत्या पांखरा (रुणझुणत्या पांखरा)
जा रे माझ्या माहेरा (जा रे माझ्या माहेरा)

रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा
(रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा)
आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा
(आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा)
(रुणझुणत्या पांखरा)

मी हो बहीण लाडकी, पंचप्राणांच्या तबकी
मी हो बहीण लाडकी, पंचप्राणांच्या तबकी
दिली कुर्हाडीची ओवाळणी, त्याचं भाव करा
(रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा)

(माया ममतेची ममतेची, आई मला भेटू दे)
(माया ममतेची ममतेची, आई मला भेटू दे)
(माहेरपणाचं पणाचं सुख मला लुटू दे)
(माहेरपणाचं पणाचं सुख मला लुटू दे)
(रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा)

कशी माहेराला येऊ, शिवंवरी उभा भाऊ
कशी माहेराला येऊ, शिवंवरी उभा भाऊ
गेला दगड मातीनं ओटी भरून माघारा
(रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा)

(गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे)
(गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे)
(हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे)
(हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे)
(रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा)

जीव लाऊन जिवाचा, टिळा लाविते रक्ताचा
आता म्होरल्या जल्मात नदी भेटु दे सागरा
नदी भेटु दे सागरा (रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा)
नदी भेटु दे सागरा (रुणझुणत्या पांखरा)

Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link