Champak Gora

चंपक गोरा कर कोमल हा, करात तुझिया देते
नेशील तेथे-येते, सखया, नेशील तेथे-येते
चंपक गोरा कर कोमल हा, करात तुझिया देते
नेशील तेथे-येते, सखया, नेशील तेथे-येते

चैत्रतरुंच्या छायेमधला गोड गारवा प्रेमे कवळू
फुलाफुलांच्या हृदयामधला मधुमासाचा सुगंध उधळू
पवनामधुनी सूर गुंजता...

पवनामधुनी सूर गुंजता तुझे गीत मी गाते
नेशील तेथे-येते, सखया, नेशील तेथे-येते
चंपक गोरा कर कोमल हा, करात तुझिया देते
नेशील तेथे-येते, सखया, नेशील तेथे-येते

निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी
दोन मनांचा संगम बघुनी हसू लागली ही जलराणी
लाजत-लाजत प्रीत देखणी...

लाजत-लाजत प्रीत देखणी जिथे मोहुनी बघते
नेशील तेथे-येते, सखया, नेशील तेथे-येते
चंपक गोरा कर कोमल हा, करात तुझिया देते
नेशील तेथे-येते, सखया, नेशील तेथे-येते



Credits
Writer(s): P Savalaram, Dutta Davjekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link