Lajun Hasanen

लाजून हासणे अन् हासून ते पहाणे
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
डोळयांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
डोळयांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे, हे प्रश्न जीवघेणे
हरती जिथे शहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे
हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा तिरपा कटाक्ष भोळा,
आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणी सुगंध वारा
देशातूनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, रात्रीस चांदण्यांचे
सुचते सुरेल गाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे



Credits
Writer(s): Mangesh Padgaokar, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link