Phite Andharache Jaale (From "Laxmichi Paule")

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरी-खोऱ्यातुन वाहे एक प्रकाश-प्रकाश
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

रान जागे झाले सारे, ओ, पायवाटा जाग्या झाल्या
रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सुर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या

ओ, एक अनोखे लावण्य, ओ, आले भरास-भरास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

दवं पिऊन नवेली झाली गवताची पाती
दवं पिऊन नवेली झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी

ओ, क्षणा पूर्वीचे पालटे, ओ, ढग उदास-उदास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक

सारे रोजचे तरीही...
सारे रोजचे तरीही नवा सुवास-सुवास

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरी-खोऱ्यातुन वाहे एक प्रकाश-प्रकाश
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
...झाले मोकळे आकाश



Credits
Writer(s): Req.
Lyrics powered by www.musixmatch.com

Link