Jo to Aapapla Yethe

जो तो आपापला, येथे कुणी ना आधार
जो तो आपापला, येथे कुणी ना आधार
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
मनाचिया घावावरी मनाची फुंकर

(जो तो आपापला, येथे कुणी ना आधार)
(जो तो आपापला, येथे कुणी ना आधार)
(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)
(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)

देह आंधळी कोठडी, बंदिवान झाले श्वास
देह आंधळी कोठडी, बंदिवान झाले श्वास
इथे कुणी कोणाची का उगा धरायची आस
इथे कुणी कोणाची का उगा धरायची आस
वाटा वेगळाल्या वेड्या, वेगळ्या जाणार
वाटा वेगळाल्या वेड्या, वेगळ्या जाणार

(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)
(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)

मानभंग, आधी-व्याधी, ना ना व्याप-ताप
कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप
मानभंग, आधी-व्याधी, ना ना व्याप-ताप
कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप
सुखे एकरंगी, दुःखे अनंत अपार
सुखे एकरंगी, दुःखे अनंत अपार

(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)
(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)

अधांतरी विश्वाचाही संसार पोरका
ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका
अधांतरी विश्वाचाही संसार पोरका
ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका
देई आर्त हाका

तोच बुडवितो, तोच तारूनी नेणार
तोच बुडवितो, तोच तारूनी नेणार

(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)
(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)

जो तो आपापला, येथे कुणी ना आधार
जो तो आपापला, येथे कुणी ना आधार
(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)
(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)
(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)
(मनाचिया घावावरी मनाची फुंकर)



Credits
Writer(s): Sudhir Moghe, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link