Pori Jaraas Lavshil Ka (From "Mala Gheun Chala")

अगं, थांब, थांब, थांब, थांब पोरी
अशी जाऊ नको गं दुरी
चल झटकन ये माघारी, दोघ राहूया एकाच घरी

तुझी मुसमुसली ज्वानी आता आलिया रंगाला
तुझी मुसमुसली ज्वानी आता आलिया रंगाला
पोरी, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?
पोरी, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?

तुझं गोरं-गोरं अंग जणू भरल्यालं वांग
जरा जवळ ये पोरी, सारं फिटलं गं पांग

ए, थोडा पिंजर लावू का गं तुझ्या वाकड्या भांगाला?
थोडा पिंजर लावू का गं, ए, तुझ्या वाकड्या भांगाला?
जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?
पोरी, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?

तु गं डोंगरची मैना, केली जीवाची या दैना
ए, तुला पाहिल्यापासून मला झोपच गं येई ना

अगं, हो माझी राधा, नको छळू श्रीरंगाला
अगं, हो माझी राधा, नको छळू श्रीरंगाला
हे, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?
पोरी, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?

तुझी नाजूक कंबर जणू हलतंया झुंबर
ए, कधी लावशील गं पोरी, सांग माझा तु number?

न्हाय लावणार मी धक्का तुझ्या चोळीच्या भिंगाला
न्हाय लावणार मी धक्का तुझ्या चोळीच्या भिंगाला
ए, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?
पोरी, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगालालाला?

तुझ्यावाचून करमना, आता धीर मला धरवं ना
अगं, नंन्नाचा पाढा मला पुन्हा-पुन्हा फिरवं ना

चाल तुझी ही तोऱ्याची शोभे मराठी ढंगाला
चाल तुझी ही तोऱ्याची शोभे मराठी ढंगाला
ए, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?
पोरी, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?

तुला पाहिलं मी निरखून, गेलं मन माझं हरकुन
अगं, कमरचं धोतर गेलं खालीच सरकून

सारी दुनिया हसतीया माझ्या नागड्या सोंगाला
सारी दुनिया हसतीया माझ्या नागड्या सोंगाला
ए, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?
जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?

ए, नाकारून, झगडून, नको जाऊस बिघडून
माझ्या घराचा दरवाजा मी ठेवलाय उघडून

चल दोघ बी पुजुया महादेवाच्या लिंगाला
चल दोघ बी पुजुया महादेवाच्या लिंगाला
ए, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला?
पोरी, जरासं लावशील का तुझं अंग माझ्या अंगालाला?

Credits
Writer(s): Dada Kondke, Ramlaxman
Lyrics powered by www.musixmatch.com

Link