Premala Upma Nahi (From "Kaiwari")

मी कशी ओळखू प्रीती
मी कशी ओळखू प्रीती
हे "हृदय" म्हणू की "लेणे"
हे "हृदय" म्हणू की "लेणे"

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
...हे देवाघरचे देणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
...हे देवाघरचे देणे

हिरवेपण पिऊनी ओले
थेंबाचे मोती झाले
हिरवेपण पिऊनी ओले
थेंबाचे मोती झाले

मी कशी फुलोरा शोधू?
मी कशी फुलोरा शोधू?
हे "फूल" म्हणू की "पाने"

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
...हे देवाघरचे देणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
...हे देवाघरचे देणे

किरणांची लेवून लाली
हे मेघ उतरले खाली
किरणांची लेवून लाली
हे मेघ उतरले खाली

मी कशी ओळखू जादू?
मी कशी ओळखू जादू?
हे "परीस" म्हणू की "सोने"

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
...हे देवाघरचे देणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
...हे देवाघरचे देणे

का नकळत डोळे मिटती?
स्पर्शात शहारे उठती
का नकळत डोळे मिटती?
स्पर्शात शहारे उठती

मी कशी भावना बोलू?
मी कशी भावना बोलू?
हे "शब्द" म्हणू की "गाणे"

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
...हे देवाघरचे देणे

मी कशी ओळखू प्रीती
हे "हृदय" म्हणू की "लेणे"

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
...देवाघरचे देणे



Credits
Writer(s): Prabhakar Jog, Jagdish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link