Taralale Dolyat

अंतरीच्या पावसाच्या
तू सरी लपवू नको
तरळले डोळ्यात पाणी
पापणी झुकवू नको

मी उन्हाच्या पाकळ्यांचा
एक जळणारा ऋतू
सावली देऊन माझी
आग तू विझवू नको

सोबती आहेस तोवर
हात हाती राहू दे
दूर गेल्यावर उगाचच
हात मग हलवू नको

मी कसा बेचैन आहे
हे जरा समजून घे
जे मला पटणार नाही
ते मला सुचवू नको



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link