Pahije Aahe Tase

पाहिजे आहे तसे मग
तू मला चुकवून जा
गुंतलेला जीव आधी
तेवढा उसवून जा

आरसा आहे तुझा मी
तर मला फोडू नको
चेहरा आहे तुला जर
तर मला सांगून जा

मी कसा वैशाख झालो
हे विचारूही नको
मी कधी आषाढ होतो
हे सुद्धा विसरून जा

मी जुन्या देशात माझ्या
चाललो आहे आता
शक्य झाले तर तुझेही
गाव तू सोडून जा



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link