Gangaram Ye

जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती
तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ
घर बांधायचे असतं आपलं आपण
साधून शक्ती युक्तीचा मेळ
ज्याची असते शक्ति अपूर्व
ज्याचे असते ध्येय अचूक
तोच दिपवू शकेल जगाला आज
होऊन खरा धडाकेबाज
अरे! पण तू आहेस तरी कुठे
गंगाराम, गंगाराम...
ये... ये... ये... ये...
ये... ये... ये... ये...
गंगाराम... ये... ये... गंगाराम... ये... ये...
जंतर मन्तर करुनी काही,
हो... ओ...
जंतर मन्तर करुनी काही, घर आम्हाला दे
गंगाराम... ये... ये... गंगाराम... ये... ये...
गंगाराम... ये... ये... गंगाराम... ये... ये...
अरे ये खुळ्या! घर बांधायचे असतं आपलं आपण
ज्याची असते शक्ति अपूर्व
ज्याचे असते ध्येय अचूक
तोच दिपवू शकेल जगाला आज
होऊन खरा धडाकेबाज
समजलं काय?
ते सर्व ठीक आहे गंगाराम पण जादू ती जादूच
आम्हा दावा की हो गंगाराम तुमच्या जादूचा अटॅमबाम्
घर आम्हा हव अस नव-नव
ओ घर आम्हा हव अस नव-नव
तुला करतो असा राम-राम
आम्हा दावा की हो गंगाराम तुमच्या जादूचा अटॅमबाम्
खामोश!
अरे जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती
तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ
चल ऊठ! अरे ऊठ!!
दिपवून टाक सार्या जगाला आज आणी होऊन दाखव खरा धडाकेबाज
अरे पण आम्ही तुझ्या जादू नगरीत आलोय ना, मग
कुठे गेली तुझी जादूनगरी रे... जादूनगरी रे...
राहायला शोधू कुठे जागा मिळाली नाही टपरी रे
शोधून आलो सारी नगरी रे. सारी नगरी रे.
बांधून दाखव बंगला उडवून रेती रे.
बांधून दाखव बंगला उडवून रेती रे.
अरे नाय लक्ष्या नाय. नाय. नाय.
आपल घर आपणच बांधायचे असत
जो पर्यंत तू धडाकेबाज होत नाही तो पर्यंत तुला गोठ्यातच राहावे लागेल रे
गोठा... परत ... परत ... गोठा...
नको... नको... नको... रे
जादूने आम्हाला हक्काच घर तू देना रे
आता या गोठ्याचा आम्हाला कंटाळा आला रे
जादूने आम्हाला हक्काच घर तू देना रे
आता या गोठ्याचा आम्हाला कंटाळा आला रे
अरे ये वेड्या! अय् पुन्हा तेच.
अरे कुठय तूझ्यातली आत्मशक्ती गेली
दाखव अरे दाखव तुझ्यातली शक्ती
जो पर्यंत दिपवत नाहीस जगाला तू होऊन धडाकेबाज तो पर्यंत...
तो पर्यंत... काय? झिम्मा खेळू
झिम्मा... झिम्मा... अरे झिम्मा...
झिम्मा झिम्मा खेळू, झिम्मा झिम्मा खेळू का रे?
झिम्मा झिम्मा खेळू, झिम्मा झिम्मा खेळू का रे?
गोठ्यात गेला रे जन्म हा निम्मा
जागेचा ना परवाना रुसली ही शम्मा
सतावते रोज ही हम्मा हम्मा
बंगला दे दे
चांगला बंगला दे दे आम्हा
बंगला, बंगला दे दे
चांगला बंगला दे दे आम्हा
अरे दे दे ना रे
हात पाय गाळणेवाले कभी घर नहीं बांधा करते लक्ष्या सेठ
ठिक आहे देऊन टाकतो तूला घर फूकटचं जे नाही तुझ्या हिमतीचं जा...
थांब थांब गंगाराम
अरे पण लक्ष्या, थांब पारु थांब I mean गंगु
गंगाराम म्हणतो तेच खर आहे
ज्याची असते शक्ति अपूर्व
ज्याचे असते ध्येय अचूक
तोच दिपवू शकेल जगाला आज
होऊन खरा धडाकेबाज
एजी, ओजी... एजी, ओजी अहो गंगारामजी
आली एनर्जी शक्तीची माझ्या जादू बाघा
चढलाय जोर करीन 1 2 का 4
माझ नाव आहे लक्ष्या, माझ नाव आहे लक्ष्या
घर बांधीन मी होऊन धडाकेबाज
माझ नाव आहे लक्ष्या, माझ नाव आहे लक्ष्या
घर बांधीन मी होऊन धडाकेबाज
घर बांधीन मी होऊन धडाकेबाज



Credits
Writer(s): Anil Mohile, Pravin Davne
Lyrics powered by www.musixmatch.com

Link