Vel Nadichya Kathavarati

वेळ नदीच्या काठावरती...
वेळ नदीच्या काठावरती भेट येऊनी मला
वेळ नदीच्या काठावरती भेट येऊनी मला

कानात सांगतो-सांगतो मग एक गुपित तुला
कानात सांगतो-सांगतो मग एक गुपित तुला
वेळ नदीच्या काठावरती...

अशी करवंदे, अशी जांभळे...
अशी करवंदे, अशी जांभळे, ऋतू जाहले सुरू
खुळ्या, पागल वेलीसाठी वृक्ष लागला झुरू

मुक्या वाहत्या पाण्यावरती कुणी जळता दिवा ठेविला?
वेळ नदीच्या काठावरती भेट येऊनी मला
कानात सांगतो-सांगतो मग एक गुपित तुला
कानात सांगतो-सांगतो मग एक गुपित तुला

खेळ खेळल्या ऊन-सावल्या, रिमझिम श्रावण सरी
खेळ खेळल्या ऊन-सावल्या, रिमझिम श्रावण सरी
अन मी वाट पाहिली तुही दुपारी हिरव्या माळावरी

मुक्या-हलत्या बेटावरती कुणी पेटता क्षण छेडीला?
वेळ नदीच्या काठावरती भेट येऊनी मला
कानात सांगतो-सांगतो मग एक गुपित तुला
कानात सांगतो-सांगतो मग एक गुपित तुला

जेव्हा येशील भेटायाला घराकडे वळतील पक्षी
बहकेल किनारा अवघा, बहकेल किनारा अवघा
पाण्यावर कोरीव नक्षी, पाण्यावर कोरीव नक्षी

मुक्या-झुलत्या फुलांवरती कुणी केशरी रंग सांडिला?
वेळ नदीच्या काठावरती भेट येऊनी मला
कानात सांगतो-सांगतो मग एक गुपित तुला
कानात सांगतो-सांगतो मग एक गुपित तुला
वेळ नदीच्या काठावरती...



Credits
Writer(s): Satishchandra More, Naamdev Dhasaal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link