Man He

मन हे तुझपाशी रमते अन भिरभिरते
हरते तन वेडे तुझसाठी घुटमळले
मन तुझपाशी रमते अन भिरभिरते
हरते तन वेडे तुझसाठी घुटमळले

भय का वाटे मला सरणाऱ्या लाजेचे?
जुळणाऱ्या गाठीचे ते सरेल का? मन हे
मन हे तुझपाशी रमते अन भिरभिरते, मन हे

माझी साथ तुझ्यासाठी, जाऊ दूर निळ्या काठी
सळसळत्या श्वासात, थरथरत्या अधरात
मिटलेल्या डोळ्यात हे दिसेल का?

मन हे तुझपाशी रमते अन भिरभिरते
हरते तन वेडे तुझसाठी घुटमळले

आता काय कुणा सांगू?
आता काय कुणा सांगू?
माझे रूप कसे पाहू?
उठले हे काहूर, पडली का ही भूल?
प्रेमाची चाहूल ही असेल का?

मन हे तुझपाशी रमते अन भिरभिरते
हरते तन वेडे तुझसाठी घुटमळले

भय का वाटे मला सरणाऱ्या लाजेचे?
जुळणाऱ्या गाठीचे ते सरेल का?



Credits
Writer(s): Narendra Bhide, Paresh Mokashi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link