Shoor Amhi Sardar (From "Maratha Tituka Melvava")

शूर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भीती?
शूर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भीती?

देव, देश अन् धर्मापायी
प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भीती?

आईच्या गर्भात उमगली
झुंजाराची रीत
आईच्या गर्भात उमगली
झुंजाराची रीत

तलवारीशी लगीन लागलं
जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेईल
अशी पहाडी छाती

देव, देश अन् धर्मापायी
प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भीती?

जिंकावे वा कटुन मरावं
हेच आम्हाला ठावं
जिंकावे वा कटुन मरावं
हेच आम्हाला ठावं

लढुन मरावं, मरून जगावं
हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी विसरू
माया-ममता-नाती

देव, देश अन् धर्मापायी
प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भीती?



Credits
Writer(s): Shanta Shelke, Anandghan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link