Pasaydan

आता विश्वात्मकें देवें येणे वाग्यत्मे तोषावें
तोषोनि मज द्यावें पसायदान हे
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परें पडो मैत्र जीवांचे

दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांच्छिल तो तें लाहो प्राणिजात
वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटो तया भूतां

चला कल्पतरूंचे आरव
चेतना चिंतामणीचे गाव
बोलते जे अर्णव, पीयूषांचे
चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु

किंबहुना सर्व सुखी
पूर्ण होऊनि तिही लोकी
भजिज़ो आदिपुरुखी अखंडित
आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीं इये
दृष्टादृष्ट विजये होआवें जी

येथ म्हणे श्री विश्वेश्वरा
हा होईल दान पसावो
येणे वरें ज्ञानदेवो सुखिया झाला
सुखिया झाला, सुखिया झाला



Credits
Writer(s): Traditional, Hrishikesh Saurabh Jasraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link