He Vishwach Vachalanche

हे विश्वच वाच्याळांचे वेधीत शब्दशर येती
हे विश्वच वाच्याळांचे वेधीत शब्दशर येती
बेचैन कशाला व्हावे...
बेचैन कशाला व्हावे सरतील उगाम दुराती
हे विश्वच वाच्याळांचे वेधीत शब्दशर येती

प्रत्येक उषत्कालाची रात्रीत सांगता होते
पतिव्रता अहिल्या, सीता होतात कलंकित जेथे
थैमान घालती वारे, जळतात संथपरी ज्योती
हे विश्वच वाच्याळांचे वेधीत शब्दशर येती

कंठशोष करिती जे-जे त्यायाच पथावर येती
लपवित पातकी चेहरे गल्लीतून माळ्या चढती
मुखवटेच निष्पापांचे या जगी पाहाया मिळती
हे विश्वच वाच्याळांचे वेधीत शब्दशर येती

बागेत अकुजा रुजते, कधी तुळस कोवळी हळवी
पापात बुडाल्या नेत्रा पावन तो फुलून दिसावी
गातात पाठ पुण्याचे पथ तेच विसरुनी जाती
हे विश्वच वाच्याळांचे वेधीत शब्दशर येती

जनरित अशी ही इथली का उगा दुभंगून जावे
शिशिरी जरी गळती पाने, तरी पुन्हा वसंत फुलावे
हे असे धुंद जगण्याचे क्षण युगा-युगातून येती
हे असे धुंद जगण्याचे क्षण युगा-युगातून येती

बेचैन कशाला व्हावे...
बेचैन कशाला व्हावे सरतील उगाम दुराती
हे विश्वच वाच्याळांचे वेधीत शब्दशर येती
हे विश्वच वाच्याळांचे वेधीत शब्दशर येती

...वेधीत शब्दशर येती
...वेधीत शब्दशर येती
...वेधीत शब्दशर येती
...वेधीत शब्दशर येती

...वेधीत शब्दशर येती
...वेधीत शब्दशर येती



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link