Dil Ye Ladaku (from "Final Round")

भल्या मनाचा माझा राया
तुच कुटुंबाची रं छाया
सुख आणाया धनी चालला

लळा लागला, लावी माया
नको कुणा नजर लागाया
तुझ्या रूपानं देवाजी पावला

भूक लागता भोळं वासरू
लुचू लागतं पान्ह्याला

भूक लागता भोळं वासरू
लुचू लागतं पान्ह्याला
माय-बाप जीवाचं रान मांडती
वाढवता त्या तान्ह्याला

भल्या मनाचा माझा राया
तुच कुटुंबाची रं छाया
सुख आणाया धनी चालला (चालला)

लळा लागला, लावी माया
नको कुणा नजर लागाया
तुझ्या रूपानं देवाजी पावला (पावला)

सपनाच्या सागराला उरी सजवायला
छोट्या-छोट्या पावलांना वाट दाखवायाला
सपनाच्या सागराला उरी सजवायला
छोट्या-छोट्या पावलांना वाट दाखवायाला

घरा-दाराचा प्रपंचाचा गाडा चालवायाला
रातीचा ही दिस करी घास पिल्ला द्यायाला

भल्या मनाचा माझा राया
तुच कुटुंबाची रं छाया
सुख आणाया धनी चालला

लळा लागला, लावी माया
नको कुणा नजर लागाया
तुझ्या रूपानं देवाजी पावला

कुंकवाचा धनी माझा बये किती साधा गं
काळजीनं काळजाचा जपतोया धागा गं
कुंकवाचा धनी माझा बये किती साधा गं
काळजीनं काळजाचा जपतोया धागा गं

वाघावानी डौल त्याच्या, तरी किती साधा गं
गरीबीची लाज नाही उन-दुन कोनाचा

भल्या मनाचा माझा राया
तुच कुटुंबाची रं छाया
सुख आणाया धनी चालला (चालला)

लळा लागला, लावी माया
नको कुणा नजर लागाया
तुझ्या रूपानं देवाजी पावला (पावला)

भूक लागता भोळं वासरू
लुचू लागतं पान्ह्याला
माय-बाप जीवाचं रान मांडती
वाढवता त्या तान्ह्याला

भल्या मनाचा माझा राया
तुच कुटुंबाची रं छाया
सुख आणाया धनी चालला (चालला)

लळा लागला, लावी माया
नको कुणा नजर लागाया
तुझ्या रूपानं देवाजी पावला (पावला)Credits
Writer(s): Santhosh Narayanan, Swanand Kirkire
Lyrics powered by www.musixmatch.com

Link