Jagi Jyas Koni Nahin

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे, तोच भार साहे
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे

बाळ सोडूनी ते दिधले कुंतीने जळात
बाळ सोडूनी ते दिधले कुंतीने जळात
घरी राधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे

भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने
भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने
नारसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने

अलौकिक त्याची मूर्ती
अजून विश्व पाहे

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे

साधुसंत कबिराला त्या छळीती लोक सारे
साधुसंत कबिराला त्या छळीती लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे

आसवेच त्यांची झाली
दुःखरूप दोहे

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे, तोच भार साहे



Credits
Writer(s): Dashrath Pujari, Madhukar Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link