Zala Sakharpuda

झाला साखरपुडा गं बाई थाटाचा
रुणुझुणु चुडा हाती गाईल गं
शालू चमचम करीन जरीकाठाचा
झाला साखरपुडा...

सांग माझ्या कानात नवरा कसा?
सांग माझ्या कानात नवरा कसा?
शूर मर्द का भितरा ससा?
रूप मदन का हुप्प्या जसा?
बृहस्पती का येडापीसा?

ऐक सांगते, तिकडची स्वारी
रूप देखणं, नजर करारी
ऐक सांगते, तिकडची स्वारी
रूप देखणं, नजर करारी

मर्द-मावळ्या मुलुखामधुनी
गर्जत जाई गरूडभरारी
मर्द-मावळ्या मुलुखामधुनी
गर्जत जाई गरूडभरारी

(नगं बाई) काय गं?
नगं बाई, दिमाग अशी दाऊ गं
स्वर्ग झाला तुला गं दोन बोटाचा
झाला साखरपुडा...

"नाकाचा सांडगा, गालाचा पापड"
"नाकाचा सांडगा, गालाचा पापड"
दळुबाई-कांडुबाई म्हणत्यात तसा
केळीच्या पानाला तूप लावुनी
वाढल्या शेवया खाईल कसा?

शूर मराठा, स्वार फाकडा
(सांग की?) शूर मराठा, स्वार फाकडा
ऐट दावितो थाट रांगडा
शूर मराठा, स्वार फाकडा
ऐट दावतो थाट रांगडा

ढाल पाठीवर, हातात भाला
स्वारी जाते मुलुखगिरीला
ढाल पाठीवर, हातात भाला
स्वारी जाते मुलुखगिरीला

नगं बानू, hmm
नगं बानू, रूपाला अशी भाळू नगं
कसा येईल फुलाला रंग देठाचा?
झाला साखरपुडा गं बाई थाटाचा
झाला साखरपुडा...



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Anandghan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link