Rang Khel to Hari

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी
(आज गोकुळात रंग खेळतो हरी)
(राधिके जरा जपून जा तुझ्या घरी)
(आज गोकुळात, सखी)

तो चटोर, चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
तो चटोर, चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो

रंगवून रंगूनी गुलाल फासतो
(सांगते अजूनही तुला परोपरी)
(राधिके जरा जपून जा तुझ्या घरी)
(आज गोकुळात, सखी)

सांग श्याम-सुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कोणा न सोडले
सांग श्याम-सुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कोणा न सोडले

ज्यास-त्यास रंग, रंग, रंग लागले
(एकटीच वाचशील काय तू तरी)
(राधिके जरा जपून जा तुझ्या घरी)
(आज गोकुळात, सखी)

त्या तिथे अनंग रंग रास रंगला
गोप-गोपिकासवे मुकुंद दंगला
त्या तिथे अनंग रंग रास रंगला
गोप-गोपिकासवे मुकुंद दंगला

तो पहा...
तो पहा मृदुंग मंजिऱ्यात वाजला
हाय, वाजली फिरून...
हाय, वाजली फिरून तीच बासरी

(राधिके जरा जपून जा तुझ्या घरी)
(आज गोकुळात रंग खेळतो हरी)
(राधिके जरा जपून जा तुझ्या घरी)



Credits
Writer(s): Suresh Bhat, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link