Sasa To Sasa Ki Kapoos Jasa

ससा, ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली

वेगे-वेगे धावू नी डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली

चुरुचुरु बोले, तो तुरुतुरु चाले
नी कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नी झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले

वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना
चालले लुटु-लुटु पाही ससा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे-वेगे धावू नी डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली

हिरवी-हिरवी पाने नी पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरकला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला

मिटले वेडे, भोळे, गुंगेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे-वेगे धावू नी डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नी शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नी धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई
"निजला तो संपला," सांगे ससा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे-वेगे धावू नी डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली



Credits
Writer(s): Anil Arun, Shantaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link