Jhunjur Munjur

हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं
हो, टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा

ढगानं काळं-निळं आभाळ आनंदलं
ढगानं काळं-निळं आभाळ आनंदलं
झाडाला, हा, पानाला, झाडाला, पानाला थेंब-थेंब पाणी डसलं रं, डसलं रं

ही झर-झर-झर गार-गार सर केसांच्या या जाळ्यांमधी आली रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा

हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं
हो, टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा
हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं

डोळं हे पाणावलं, काळीज आसावलं
डोळं हे पाणावलं, काळीज आसावलं
पिरतीनं, धुंदीनं, पिरतीनं, धुंदीनं अंग-अंग माझं सजलं रं, सजलं रं
मी पाण्यात भिजुन इथं थिजुन तुझ्यासाठी येडीपीशी झाले रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा

हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं
हो, टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा
हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं
हो, टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं

अंग माझं ओलंचिंब झालं रं, हो, अंग माझं ओलंचिंब झालं रं
अंग माझं ओलंचिंब झालं रं, अंग माझं ओलंचिंब झालं रं

Credits
Writer(s): Shantaram Nandgaokar, Rajendra Vinay
Lyrics powered by www.musixmatch.com

Link