Pavhani Aali

पाहुणी आली माझ्या घरी
पाहुणी आली माझ्या घरी
अंबिका माया जगदीश्वरी
अंबिका माया जगदीश्वरी

या डोळ्यांच्या दोन रांजणी
या डोळ्यांच्या दोन रांजणी
पस्ताव्याचे भरले पाणी
पस्ताव्याचे भरले पाणी

त्या पाण्याने न्हाऊ घालिते...
त्या पाण्याने न्हाऊ घालिते बसवून पाटावरी
अंबिका माया जगदीश्वरी
अंबिका माया जगदीश्वरी

रक्तामधले इमान बळकट
रक्तामधले इमान बळकट
त्याचा भाळी भरिते मळवट
त्याचा भाळी भरिते मळवट

भलेपणाची फुले ठेविते...
भलेपणाची फुले ठेविते वाकुन पायावरी
अंबिका माया जगदीश्वरी
अंबिका माया जगदीश्वरी

चुका चाकवत केली भाजी
चुका चाकवत केली भाजी
भाव-भक्तिची भाकर ताजी
भाव-भक्तिची भाकर ताजी

लेक दरिद्री तुझी विनविते...
लेक दरिद्री तुझी विनविते, "आई भोजन करी"
अंबिका माया जगदीश्वरी
अंबिका माया जगदीश्वरी

पाहुणी आली माझ्या घरी
पाहुणी आली माझ्या घरी
अंबिका माया जगदीश्वरी
अंबिका माया जगदीश्वरी



Credits
Writer(s): Vasant Pawar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link