Utha Utha Chiutaai

उठा-उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले अजुनही
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी अजुनही?
अजुनही, अजुनही

लगबग पांखरे ही
गात-गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे चोहीकडे
चोहीकडे, चोहीकडे

झोपलेल्या अशा तुम्ही
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी?
बाळासाठी चारापाणी चिमुकल्या
चिमुकल्या, चिमुकल्या?

बाळाचे मी घेता नाव
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई

उठोनीया दूर जाई
भूरभूर, भूरभूर
उठोनीया दूर जाई
भूरभूर, भूरभूर



Credits
Writer(s): Kusumagraj, Kamalakar Vinayak Bhagwat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link