Bharjari Ga Pitambar

भरजरी गं पितांबर दिला फाडून
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण
सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरीचे कापले गं बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली
सुभद्रा बोलली शालू नि पैठणी
फाडून का देऊ चिंधी तुम्हांसी मी
पाठची बहीण झाली वैरीण
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण
भरजरी गं पितांबर दिला फाडून
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण
द्रौपदी बोलली हरीची मी कोण
परी मला त्याने मानिली बहीण
काळजाची चिंधी फाडून देईन
येवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभू राखी माझी लाज
चिंधी साठी आला माझ्या दरी हरी आज
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण
भरजरी गं पितांबर दिला फाडून
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खूण
धन्य तोचि भाऊ धन्य ती बहीण
प्रीती ती खरी जी जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण



Credits
Writer(s): Acharya Athreya, Vasant Shantaram Desai
Lyrics powered by www.musixmatch.com

Link